In this COVID-19 pandemic, schools and colleges are severely disrupted, needless to mention about the job market. The need to join the hands to help the youths to find a way through their careers has never been so urgent than now. Like many of you I also come from a small village in Beed district of Maharashtra, moved to the cities for higher education in India and the USA. But this could not have been possible without amazing mentoring that I received time-to-time from my mentors. The mentors appeared in the form of my relatives, classmates, senior friends, professors or some unknown individuals. I was lucky enough to get the right career guidance from the right people at the right time. Those ‘right’ people acted as my informal mentors to guide me when I needed help to make career decisions and I am ever grateful to them. I cannot emphasize enough the important role those informal and formal mentors played in my career. But not everyone gets such career guidance (mentoring) due to lack of access to the right mentors, especially for youths in rural India.
On the other hand, there are many individuals from rural India who struggled, earned good education and are now excelling in their careers. Many of these individuals wish to help the youths who are struggling to navigate through their careers and who with little guidance can find their career path. Mentor Yuva platform will help to connect the youths who are looking for career guidance and the willing individuals who want to give back to society.
In my opinion, mentoring is beyond just providing the guidance. It is being a partner in the mentee's career journey and being available for the mentee to guide to the right resources and in the right direction, and help the mentee to bring the best out of them. In my personal experience as a mentee and a mentor, in this mentoring process mentors also learn a lot. So it is a win-win for both, mentors and mentees, to grow professionally.
I appeal to the potential mentors to extend your helping hand to the youths of our country (mentees) and help them grow professionally especially in this tough time of COVID 19 pandemic.
या कोविड-१९ साथीच्या रोगात शाळा आणि महाविद्यालये विस्कळीत झाली आहेत, जॉब बद्दल तर बोलायलाच नको! तरुणांना या कठीण परिस्थितीत करियर मार्गदर्शनाची आणि मदतीची सर्वात जास्त गरज आत्ताच आहे. तुमच्यापैकी बर्याच जणांप्रमाणे मीही महाराष्ट्रातील (बीड जिल्ह्यातील) एका छोट्याशा गावातून आलो आहे, आणि उच्च शिक्षणासाठी शहरांमध्ये आणि अमेरिकेला जावे लागले. परंतु माझे शिक्षक, नातेवाईक, वर्गमित्र, वरिष्ठ मित्र, प्राध्यापक किंवा काही अज्ञात व्यक्ती यांच्याकडून योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नव्हते. योग्य वेळी योग्य लोकांकडून योग्य करिअर मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. करियर बद्दलचे निर्णय घेण्यासाठी जेव्हा मला मदत हवी होती तेव्हा त्या ‘योग्य’ लोकांनी माझे अनौपचारिक मेंटॉर (मार्गदर्शक) म्हणून काम केले आणि त्यांचा मी सदैव ऋणी राहील. माझ्या करियरमध्ये त्या अनौपचारिक आणि औपचारिक मार्गदर्शकांनी पार पाडलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर मी जेव्हढा जोर देईल तेव्हडा कमीच पडेल. परंतु योग्य मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे, विशेषत: ग्रामीण भागात, प्रत्येकाला योग्य वेळी असे करिअर मार्गदर्शन मिळत नाही.
तथापि, दुसरीकडे ग्रामीण भागातील बर्याच व्यक्ती अशा आहेत ज्यांनी संघर्ष केला, चांगले शिक्षण मिळवले आणि आता उत्तम करिअर केले आहे. आणि यांपैकी बहुतेक जण आपल्या बांधवांना मार्गदर्शन रुपी मदतीचा हात पुढे करू इच्छितात. मेंटॉर युवा™ हा प्रोजेक्ट अशा दोन व्यक्तींना, ज्यांना मार्गदर्शन हवे आहे (मेंटी) आणि जे मार्गदर्शन करून इच्छितात (मेंटॉर), जोडेल.
माझ्या मते, मेन्टॉरिंग फक्त मार्गदर्शनपुरतेच मर्यादित राहते असे नाही. मेंटॉर हा मेंटीच्या करियर मधील साथी आहे आणि मेंटी मधील सुप्त गुणांना चालना देण्याचेही महत्वाचे काम मेंटॉर करतो. माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार, या मार्गदर्शनाच्या प्रक्रियेत मेंटॉर देखील बरेच काही शिकतात.
मी मेंटॉर स्वयंसेवकांना आवाहन करतो की आपला मदतीचा हात पुढे करून ग्रामीण युवकांना, विशेषतः या कोविड-१९ साथीत, त्यांच्या करियर प्रगती मध्ये हातभार लावावा आणि युवकांनीही या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.
Dr. Vijay P. Kale,
M.V.Sc., PhD, DABT, ERT,
Scientist, Drug Discovery and Development.
डॉ. विजय प्र. काळे,
एम. व्ही. एस्सी., पी.एच.डी., डी.ए.बी.टी., ई.आर.टी.,
शास्त्रज्ञ, औषध संशोधन.